Share

हा तर फक्त लॉलिपॉप; पेट्रोल-डिझेल दरकपातीवर काँग्रेसचं टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

रायपूर : दिवाळीच्या आधी जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत होत्या. या पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत होती. पेट्रोलच्या दराने चक्क शंभरी पार केली होती. केंद्रावर सर्वसामान्य चांगलेच संतापले. त्यावरुन केंद्राने दिवाळीच्या दिवशी एक्साईज टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये 5 आणि 7 रुपये अशी किंमती कमी झाल्या.

केंद्राने केलेल्या दर कपाती वरुनही विरोधकांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्रातील वरीष्ठ नेत्यांनंतर आता काँग्रेसशासित राज्य सरकारकांकडून या निर्णयावर आक्षेप घेतला जात आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पेट्रोल-डिधेल दरकपातीवरून निशाणा साधला आहे.

केंद्रानं घेतलेला हा निर्णय म्हणजे फक्त लॉलिपॉपच की. ‘जर एनडीए सरकारने यूपीए सरकारप्रमाणेच एक्साईज ड्युटी ३० रुपयांवरून ९ रुपयांपर्यंत कमी केली, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नक्कीच कमी होतील. पण ३० रुपयांनी आधी पेट्रोल वाढवायचं आणि त्यानंतर ते ५ रुपयांनी कमी करणं हे फक्त एक लॉलिपॉप आहे’, असं भूपेश बघेल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!