मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. अनिल देशमुख यांचे वकील अॅड. इंदरपाल सिंग यांनी माध्यमांशी बोलताना देशमुखांच्या मुलाने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
आरोपी नसतानाही अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही अटकेची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं वकील इंदरपाल सिंग यांनी सांगितलं.
देशमुख प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणि हायकोर्टात खटला सुरू होता. तुम्ही आरोपी नाहीत. त्यामुळे तुम्ही चौकशीसाठी या असं प्रतिज्ञापत्रं ईडीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख हे स्वत:हून चौकशीला हजर झाले. मात्र, त्यांना अटक करण्यात आली. ते तुम्ही पाहत आहात. त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांनाही आपल्याला अटक होऊ शकते याचे भान आहे. त्यामुळे ते कायदेशीर बाबी तपासून पाहत आहेत, असं इंदरपाल सिंग यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- कृषी कायद्यांना विरोध करणारे गावातील बेरोजगार दारुडे; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ
- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’
- आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
