Share

किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ

Published On: 

मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा तब्बल २६ दिवस अटकेत होता. २६ दिवसांनंतर जामीनावर आर्यन तुरुंगातून बाहेर आला आहे. दरम्यान, या ड्रग्ज प्रकरणापासून सुरू झालेल्या नाट्याने आता वेगळंच वळण घेतले आहे. आर्यनसोबतच्या सेल्फीमुळे चर्चेत आलेला किरण गोसावी याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलीस कोठडीत आता वाढ कऱण्यात आली आहे.

आर्यन खानवरील कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. फक्त एवढेच नाही तर आर्यन खान सोबत सेल्फी काढल्यामुळेही गोसावी चर्चेत आला होता.

दरम्यान, क्रूझवरील कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली होती. त्यानंतर गोसावीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. परंतु आता या कोठडीत वाढ करण्यात आली असून ८ नोव्हेंबरपर्यंत गोसावीला तुरुंगातच राहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!