🕒 1 min read
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये सतत काही ना काही खटके उडत असतात त्यातच आता भारताचा पाकिस्तानवर किती दरारा आहे हे दर्शविणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना मागील वर्षी पाकिस्तानच्या सैन्याने अटक केली होती. त्यानंतर काही तासांतच त्यांची सुटका करण्यात आली होती. अभिनंदन यांच्या मुद्यावरून पाकिस्तानमध्ये अद्यापही राजकारण सुरू आहे.
अभिनंदन यांना न सोडल्यास भारत हल्ला करेल अशी भीती परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी व्यक्त केली असल्याचा दावा खासदार अय्याज सादिक यांनी केला. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.भारत पाकिस्तानवर हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय लटपटत होते आणि चेहरा घामाने भिजला होता. बाजवा यांना भारत हल्ला करेल अशी भीती होती,’ असा खुलासा केला आहे.
पाकिस्तानी सरकारच्या मनात भारताबद्दल अशी काही भीती होती, की त्यांनी कुठलाही वेळ वाया न घालवता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तत्काळ मुक्त केलं आणि भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूश करण्यासाठी अभिनंदन यांना सोडण्यात आल्याचंही ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले.
राहुल जी,
आप Surgical Strike औरAir Strike पर सवाल उठा रहे थे ना?
ज़रा देखिए मोदी जी का क्या ख़ौफ़ है पाकिस्तान में
सरदार अयाज़ सादिक़ बोल रहे है पाकिस्तान के National Assembly में की Pak के Cheif of Army Staff के पैर काँप रहे थे और चेहरे पर पसीना था,कहीं भारत अटैक न कर दे!
समझें? pic.twitter.com/QdzxKetUzW— Sambit Patra (@sambitswaraj) October 28, 2020
दरम्यान, पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांचा व्हिडीओ ट्विट करत भाजप प्रवक्ते संबित पात्रांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना टोला लगावला आहे. ‘राहुलजी, तुम्ही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत होतात ना? जरा पाहा पाकिस्तानाला मोदींची किती भीती वाटते. पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे पाय कापत होते. चेहऱ्यावर घाम होता. भारत हल्ला तर करणार नाही ना याची भीती त्यांना वाटत होती, असं पाकिस्तानी संसदेत सरदार अयाज सादिक बोलत आहेत. समजलं का?,’ असं पात्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- श्रीदेवीनंतर आता श्रद्धा साकारणार नागिणीची भूमिका
- जान सानू प्रकरण: चौफेर टीकेनंतर अखेर ‘कलर्स’ने मागितली महाराष्ट्राची माफी
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- भारताचा चुकीचा नकाशा दर्शवल्या प्रकरणी संसदेच्या समितीने ट्विटरला फटकारले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
