नवी दिल्ली: डेटा संरक्षण विधेयक, २०१९ या विषयी संसदेच्या संयुक्त समितीची बैठक झाली यावेळी समितीसमोर मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचे प्रतिनिधी हजर झाले होते यावेळी आणि सदस्यांनी लडाखला चीनचा भाग म्हणून दर्शविल्याबद्दल सदस्यांनी त्यांची चौकशी केली. समितीने ट्विटर कडे या विषयावर लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. २२ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना “भारतीय नकाशाचे चुकीचे वर्णन” केल्याबद्दल देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा अनादर करण्याचा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मद्वारे केलेला कोणताही प्रयत्न “पूर्णपणे अस्वीकार्य” आहे. अशा कडक शब्दांत फटकारले होते.
त्यानंतर ट्विटर ने दिलेल्या स्पष्टीकरणावर भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एकमताने युक्तिवाद केला की, लडाखला चीनचा भाग म्हणून दाखवण्याचे ट्विटरचे स्पष्टीकरण “अपुर” आहे. “लडाखला चीनचा एक भाग म्हणून दर्शविणे हे भारताच्या सार्वभौमत्वाविरूद्ध आहे आणि फौजदारी गुन्हा म्हणून त्याला 7 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
यावर आयटी सेक्रेटरी अजय सावनी यांनी ट्विटरवर असा इशारा दिला होता की अशा प्रयत्नांमुळे इतर व्यासपीठावर देखील नामुष्की येते तर मध्यस्थ म्हणून तटस्थता व निष्पक्षता यावरही प्रश्न उपस्थित होतात. सावनी ने ट्विटरला भारतीय नागरिकांच्या संवेदनशीलतेचा आदर करण्यास सांगितले होते, तसेच नकाशांनीही प्रतिबिंबित झालेल्या भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा अनादर करण्याचा ट्विटरने केलेला कोणताही प्रयत्न पूर्णपणे अस्वीकार्य व बेकायदेशीर असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल गोटे यांनी पाडले भाजपला खिंडार,धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
- जान सानू प्रकरण: चौफेर टीकेनंतर अखेर ‘कलर्स’ने मागितली महाराष्ट्राची माफी
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- जनतेचा सेवक असल्याने जागा हडप करणाऱ्यांना माफ करणार नाही- लहू कानडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

