🕒 1 min read
मुंबई : गुरुवारी संध्याकाळी मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत बोलण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात मराठा समाजाच्या संघटनांच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोकरभरती संदर्भात एक मोठी घोषणा केली. त्यामध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या निर्णयावरून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे यांनी एकनाथ शिंदे यांचे मानले आभार-
आपल्या लढ्याला यश आले असून, शासकीय नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर माझे उपोषण सोडविताना दिलेले आश्वासन पाळले, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. सकाळी संभाजीराजे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
सरकारने त्यावर कोणताच निर्यण घेतला नाही-
उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकरिता कायदेशीर पद्धत म्हणून अधिसंख्य जागा निर्माण करण्याची संकल्पना सर्वप्रथम आम्ही पुढे आणली. ही संकल्पना समाजाची मागणी म्हणून आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दि. 17 जून 2021 रोजी झालेल्या बैठकीत हा मुद्दा आम्ही मांडला असता त्यांनी यावर निर्णय घेण्यासाठी 15 दिवसांचा वेळ मागितले होते. त्यानंतर महिना झाला तरी सरकारने त्यावर कोणताच निर्यण घेतला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चालढकल करीत होते-
फेब्रुवारी 2022 मध्ये आझाद मैदान येथे मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो. यावेळी, राज्य सरकार सोबत समन्वयकांची बैठक झाली असता, नियुक्त्यांच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चालढकल करीत होते. त्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन त्यांनाही हा विषय समजावून देऊन, या उमेदवारांना त्यांचा न्याय द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी अधिसंख्य जागा निर्माण करून मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय घेतला, असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | बहुमत असुनही मोदी सरकार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घाबरते- शिवसेना
- Shivsena । भाजपाचे बहुमत निखळ नाही, ते चोरलेले आहे; शिवसेनेचा हल्लाबोल
- Ajit Pawar | शिंदे सरकारला मान्यता मिळाल्यास लोकशाहीला धोका- अजित पवार
- Winter Session | तारीख ठरली! या वर्षीचं हिवाळी अधिवेशन होणार ‘या’ तारखेला
- Supriya Sule | …म्हणून दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो- सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
