🕒 1 min read
अहमदनगर : करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. अशीच मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे.
आज अभिनेता सोनू सूद यांनी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. यावेळी सोनू आपल्या कुटुंबासोबत बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी सोनू सूद यांनी बाबांच्या दर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. यावेळी लॉकडाऊन च्या काळात त्यांनी मदत केली होती यावर सोनू म्हणाले, ‘जितका मोठा परिवार जबाबदारी इतकीच मोठी असते. तर हे काम साईबाबांच्या आशीर्वादाने झाल्याच त्यांनी म्हटल. तर यावेळी सोनुने शिर्डीतील वृद्धाश्रमाला भेट दिली.
नुकताच अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रितेश देशमुख थोडक्यात बचावला; चाहत्यांना दिला सावधगिरीचा इशारा
- अर्धशतकी खेळीनंतर शुभमन गिल माघारी; टीम इंडियाला सलग दुसरा धक्का
- डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही – रामदास आठवले
- पुण्यातील शारदा गजानन मंदिरात २५ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी, घटना CCTV मध्ये कैद
- कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीची नोंद इतिहासात निश्चितपणे घेतली जाईल- पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
