Share

नामांतराच्या मुद्द्यावरून अजितदादा भडकले, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.

या वादावर अनेक नेते रोज प्रतिक्रिया देत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मुद्द्यावरून आज काहीसे संतापलेले पाहायला मिळालं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून यावर चर्चा करतील अशी भूमिका त्यांनी काल स्पष्ट केली होती. मात्र, पुण्यातील एका कार्यक्रमानंतर त्यांनी, ‘नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत. लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं’, मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे हा मुद्दा राजकीय क्षेत्रात सद्या तापलेला असला तरी राज्यातील इतरही गरजेचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे याकडं त्यांनी लक्षवेधलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!