Share

काँग्रेसकडून राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर, आ.नमिता मुंदडा यांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद –  यापूर्वीच्या युपीए सरकारने केवळ राजकारणासाठीच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप भाजप आ. नमिता मुंदडा यांनी केला.केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्याकरिता औरंगाबादेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी यापूर्वीच्या काँग्रेस सरकावर टीका केली.

त्या म्हणाल्या, ‘पीएमएस-एससी’ या योजनेच्या निधीत यापूर्वीच अशी वाढ करणे अपेक्षित होते. मात्र, यापूर्वीच्या युपीए सरकारने केवळ राजकारणासाठीच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाचा वापर केला. अनुसूचित जाती वर्गातील लोकांच्या खऱ्या अडचणी समजून घेऊन ते सोडवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या निधीत वाढ करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मार्ग खुला केला आहे’.

2017 ते 2020 या कालावधीत अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करीता दरवर्षी 1100 कोटी रूपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षात दरवर्षी हा निधी 6 हजार कोटी रुपये करण्यात आला आहे. या निधीतील केंद्र सरकारचा वाटा 60 टक्के असून राज्य सरकारला 40 टक्के खर्च करावा लागणार आहे.

दहावीनंतर पैशाअभावी ज्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मुंदडा यांनी केले. यावेळी अनुसुचित मोर्चा प्रदेश सरचिटनीस जालिंदर शेंडगे, चंद्रकांत हिवराळे, राजेश मेहता, राजु शिंदे, बबनराव नरवडे, पंकज भारसाखळे, डॉ.राम बुधवंत उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!