Share

‘संभाजीनगर’ घोषणा १९८८ मध्येच; विमानतळ नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात धूळ खात पडून-अंबादास दानवे

Published On: 

औरंगाबाद:आमच्यासाठी ‘संभाजीनगर’ ही घोषणा मे १९८८ मध्येच झाली आहे. मात्र संभाजीनगर विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाच्या टेबलावर धूळ खात पडलेला आहे. त्यासाठी भाजप नेत्यांनी जाऊन जोर लावावा. तेव्हा कळेल या शहराविषयी तुम्हाला किती प्रेम आहे. असा टोला आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरल्याचे पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद की संभाजीनगर हा वाद गेल्या ३० वर्षांपासून गाजत आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात. तेव्हा तेव्हा हा मुद्दा शिवसेना-भाजप कडुन तापवला जातो. शिवसेनेच्या वतीने संभाजीनगरची हाक दिली होती. सत्तेत आल्यानंतर संभाजीनगर नामांतर करणार असे शिवसेनेने सांगितले होते. परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये.

दुसरीकडे शासकीय पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. याच संभाजीनगरच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. शिवसेना-भाजप सोबत २५ वर्षे युतीमध्ये सडली असे वक्तव्य नुकतेच उद्धव ठाकरे यांनी केले होते. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला संभाजीनगरच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडले आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

तुम्ही साधे औरंगाबादचे संभाजीनगर करून दाखवले नाही. शिवसेनेने बोलण्या व्यतिरिक्त काय करून दाखवले. असा खोचक टोला देवेंद्र फडणीसांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले तुम्ही साधे औरंगाबादचे संभाजीनगर केले नाही. उस्मानाबादचे धाराशिव करू शकले नाहीत. मात्र भाजपने उत्तर प्रदेशात प्रयागराज करून दाखवले. आम्ही करून दाखवले तर तुम्ही फक्त बोलतच राहिला. हिंदुत्व हे जगावं लागतं. आणि मोदींनी ते करून दाखवले. अशा प्रकारची टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!