🕒 1 min read
मुंबई: येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Woman) २९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी राज्यातील महिला धोरण आणि महिला सुरक्षितता अशा विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या, महाविकास आघाडी काळात अजून महिला धोरणं आणखी प्रो ॲक्टीव करू शकतो. महीला धोरणांची अंमलबजावणी झाली पाहीजे. रस्त्यावर प्रत्येक २५ किमी वर टॉयलेट हवेत, हे कर्नाटक मध्ये आहे तर आपल्या इथे का नाही असंही त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की, महीला धोरणांना आपण महत्व देत नाहीत, त्यांना महत्व दिलं पाहीजे. कोस्टल रोड झाली नाही तरी चालेल पण मुलांसाठी, महीलांसाठी पैसे दिले पाहीजे यासाठी मी भांडते असं त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बद्दल देखील मत व्यक्त केले आहे. ठाकूर म्हणाल्या, शरद पवार आहेत म्हणून महाविकास आघाडी सरकार जोरात सुरू आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. सध्या शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी देशभरातून नेते मंडळींनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
‘…यांची मानसिक स्थिती अत्यंत खालावली आहे’; कॉंग्रेसची किरीट सोमय्यांवर टीका
-
‘ऊर्जामंत्र्यांचे ते विधान बरोबर नाही’; नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
