मुंबई : दाक्षिणात्य ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर पुन्हा एकदा साऊथ सिनेसृष्टीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अलिकडच्या काळात बॉलिवूडसह आता दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ चित्रपट सर्वत्र गाजला. तसेच अल्लू अर्जुनच्या मानधनाचीबद्दल चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकत पहायला मिळाले. मात्र अल्लू अर्जुनपेक्षा अधिक ही महागडा अभिनेता आहे. चला जाणून घेऊ या.
दरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन च्या ‘पुष्पा’ चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडाही पार केला असून विशेष म्हणजे अल्लू अर्जुन साऊथमधील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मात्र या इंडस्ट्रीमध्ये बरेच असे दिग्गज कलाकार आहेत, ज्यांच्या अभिनयाचे भरपूर चाहते पहायला मिळतात. यापैकी आणखी एक लोकप्रिय अभिनेता म्हणजे ज्युनिअर एनटीआर(Junior NTR). अॅक्शन सीनसाठी तो चांगलाच प्रसिध्द आहे. या अभिनेत्या चित्रपटातील मानधनाबद्दल बोलायचं झाल्यास तो एका चित्रपटासाठी ४५ कोटी रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं. तसेच एकेकाळी ज्युनिअर एनटीआर एका चित्रपटासाठी २५ ते ३० कोटी रुपये मानधन घ्यायचा. मात्र आता त्याच्या मानधनात वाढ झाल्याची माहिती मिळाली आहे.

त्याचप्रमाणे आपल्या स्टाईने चाहत्यांना आकर्षित करणारा अभिनेता रामचरण (Ramcharan) याचे देखील नाव यादी आहे. सध्या रामचरण RRR या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी त्याने ४५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार, रामचरणने त्याच्या आगामी चित्रपटांसाठीचं मानधन वाढवलं असून त्याने त्याच्या नेक्स्ट प्रोजेक्टसाठी तब्बल १०० कोटी रुपये मानधन आकारल्याचं सांगण्यात येतं आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील महेश बाबू (Mahesh Babu) आज लाखो तरुणींचा लोकप्रिय आहे. महेश बाबूने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, तो प्रत्येक चित्रपटासाठी २०- ३० कोटी रुपये घेतो. बाहुबली या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रभास (Prabhas) हा देखील साऊथ चित्रपटातील प्रसिध्द अभिनेता आहे. त्याने एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन घेतो. त्याचप्रमाणे नुकतच जय भीम या चित्रपटामुळे चर्चेत आलेला सूर्या (Surya) देखील चाहत्यांचा लोकप्रिय अभिनेता ठरला असून तो देखील २५ कोटीच्या आसपास मानधन घेतो.
महत्वाच्या बातम्या:
‘…यांची मानसिक स्थिती अत्यंत खालावली आहे’; कॉंग्रेसची किरीट सोमय्यांवर टीका
‘ऊर्जामंत्र्यांचे ते विधान बरोबर नाही’; नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर भाजप आक्रमक; पुनम महाजन म्हणाल्या,“नामर्दांसारखे कार्टून…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

