🕒 1 min read
पुणे : आज मराठा क्रांती मोर्चाकडून पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समन्वयक, विविध मराठा संघटनांचे कार्यकर्ते हे या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी मराठा समाजातील व्यक्तींच्या बाजू, भावना ऐकून घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी पुढील भूमिका जाहीर केली.
त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त करतानाच आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे देखील सांगितलं आहे. ‘राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी सावरोचह न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेचा विसर पडला आहे. पुनर्विचार याचिकेच्या सोबत आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे असेल तर हा समाज मागासलेला असल्याचं दाखवणे गरजेचं आहे. मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नसल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्याने आरक्षण मिळत नाही,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
‘मराठा समाजातील काही लोक हे सुस्थिर असले तरी बहुतांश समाज हा शेती आणि इतर छोट्या-मोठ्या साधनांद्वारे उदरनिर्वाह करत असून त्यांची आर्थिक स्थिती आणि इतर बाजू या कमकुवत आहेत. त्यामुळे जर आरक्षण द्यायचं असेल तर पुन्हा नव्या आयोगाची स्थापना करून मराठा समाजाचं मागासलेपण समोर आणणं गरजेचं आहे. या आयोगात समाजातील झळ पोहोचलेले सदस्य, युवक यांची नेमणूक करावी ज्याने काम नीट होईल. यासोबतच, सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय काही होऊ शकत नाही, त्यामुळे पहिले हेच करणं गरजेचं आहे,’ असं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नामांतर शहीद स्मारकाचे काम गतीने करा, आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची कुलगुरूंकडे मागणी!
- नीरज चोप्राप्रमाणेच राखी सावंतने फेकला भाला ; पाहा ‘हा’ भन्नाट व्हिडीओ
- शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला अटक होण्याची शक्यता
- भारतीय संघाला पहिल्या टेस्टपासून मिळेल ‘हा’ फायदा : दिनेश कार्तिक
- पुन्हा मूक आंदोलनाची सुरुवात; मराठा समाजाच्या मागणीनंतर संभाजीराजेंची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
