Share

ठरलं…! मराठा आरक्षण प्रश्नी २७ मे नाही तर ‘या’ तारखेला संभाजीराजे मांडणार आपली भूमिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोना काळातील गांभीर्य ओळखून संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, यानंतर चाललेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर संभाजीराजे हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हीच भूमिका असून आता महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जाऊन मराठा समाजाच्या भावना समजून घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

संभाजीराजेंच्या दौऱ्याला कोल्हापुरातून सुरुवात झाली असून ते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मुंबईत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. मराठा आरक्षणप्रश्नी समाजातील विविध नेते आपल्या भूमिका व मोर्चे काढण्याच्या तयारीत असताना आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज संभाजीराजे हे काय भूमिका घेणार याकडं राज्यभरातील मराठा समाजाचं लक्ष्य लागलं आहे.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1882434405248103

‘संभाजीराजेंच्या दौऱ्याला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत असून त्यांनी आपल्या दौऱ्याचा आणखी एक दिवस वाढवला आहे. त्यामुळे २७ मे ऐवजी २८ मे रोज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!