Share

शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण ; शेतकऱ्यांनी केला काळा दिवस साजरा

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना देखील गेल्या सहा महिन्यांपापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे.

कोरोना संकटकाळात संयुक्त किसान मोर्चाने नव्या कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात काळा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. कारण आज कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशातच शेतकऱ्यांनी सर्व देशवासियांना या आंदोलनाला समर्थन करण्याचं आवाहन केलं असून तसेच आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे झेंडे लावून पाठिंबा दर्शवण्यास सांगितलं आहे.

तसेच निषेध व्यक्त करत पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळण्याचंही आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांनी शेतकरी नव्या कृषी कायद्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारशी चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. आतापर्यंत आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र आणि शेतकरी संघटनांमध्ये 11 बैठका झाल्या आहेत.तरी देखील अजूनपर्यंत यावर तोडगा काही निघत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!