Share

शरद पवार म्हणाले, कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम दरवर्षी राबवले जातात. वाढदिवसानिमित्त आज मुंबईत कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली तसेच देशभरातून शरद पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात शरद पवारांनी देखील संवाद साधला.

वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. जेव्हा ते कृषिमंत्री होते त्यावेळची एक आठवान त्यांनी सांगितली. शरद पवार म्हणाले, मी केंद्रीय कृषीमंत्रीपदाची शपथ घेतली, त्याच दिवशी सायंकाळी माझ्याकडे एक फाईल आली. देशात अन्नधान्यांचा साठा कमी असल्याने ब्राझीलवरून धान्य आयात करण्याची फाईल होती. शेतीप्रधान देशात दोन वेळेचे अन्न मिळू शकत नाही मला वाईट वाटले. मी स्वाक्षरी केली नाही. पण त्या फाईल मधला मजकूर वाचून मी अस्वस्थ झालो होतो.

पुढे बोलताना पवार म्हणाले, दूसऱ्या दिवशीही मी देशात अन्नधान्य कमतरतेची परिस्थिती कशी बदलता येईल याचा विचार करत होतो. पण त्यानंतर आम्ही देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव दिला. शेतीत वेगवेगळे प्रयोग आणि योजना राबवण्यात आल्या. नंतर आज हा देश १८ देशांना अन्न धान्य पुरवणारा देश झाला. हे सर्व आपल्या शेतकऱ्यांनी केल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!