औरंगाबाद : संभाजी ब्रिगेडतर्फे आगामी विधानसभा निवडणुका लढणार आहेत. यासाठी 15 उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत आम्हला यश मिळेल असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यभर संपर्कप्रमुखानी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या आहेत. संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले आहे. यामुळे आमचा राजकीय अजेंडा ठरला असून आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी उभे केले आहे. या निवडणुकीत आम्हाला यश मिळेल असा विश्वासही भानुसे यांनी व्यक्त केला.
हे आहेत उमेदवार
दिलीप किसनराव मडावी, (गडचिरोली), जगदीश नंदूजी पिलारे, ब्रह्मपुरी, (चंद्रपूर), अरुण नामदेवराव कापडे, वरोरा (चंद्रपूर), भगवान भीमराव कदम, भोकर, धनंजय उत्तमराव सूर्यवंशी, नांदेड उत्तर, (नांदेड), बालाजी माधवराव शिंदे, जिंतूर, (परभणी), टिळक गोपीनाथराव भोस
श्रीगोंदा (अहमदनगर), डॉ.संदीप माणिकराव तांबारे, उस्मानाबाद (उस्मानाबाद), दिनेश गोपीनाथराव जगदाळे, म्हाडा (सोलापूर), सोमनाथ विजय राऊत, सोलापूर उत्तर (सोलापूर), किरण शंकरराव घाडगे, पंढरपूर (सोलापूर), ऋतुराज जयसिंगराव पवार, तासगाव कवठेमहाकाळ (सांगली),माणिकराव महादेव पावडे, कारंजा (जि.वाशिम), अशिष नरसिंगराव खंडागळे, आर्वी, (वर्धा), राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे देवळी, (वर्धा) यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
-
दुष्काळाचा शेष जातोय कुठे, अमोल कोल्हे सरकारवर बरसले
-
तावडेंबाबत भाष्य करण्याची आता इच्छा नाही : खा. संभाजीराजे भोसले
-
जगात अक्षय कुमार चौथ्या स्थानावर; संपत्ती ऐकूण व्हाल थक्क!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
