टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर येथील छ.शाहू शिक्षण प्रसारक मंडळाची श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर व हायस्कूल ही इमारत निवारा केंद्रासाठी दिलेली आहे. तीन आठवड्याहून अधिक काळ स्तलांतरीत येथे वास्तव्यास आहेस. संस्थेचे चेअरमन समरजितसिंह घाटगे याना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या खाण्यापिण्याची प्रकृती ची विचारपूस करून त्यांच्या भावना जाणून घ्यावयाच्या होत्या.परुंतु लॉकडाऊन मूळे निवारा केंद्रातील स्थलांतरितांना ते इच्छा असूनही भेटू शकत नव्हते त्यावर त्यांनी वेगळा मार्ग काढला.त्यांच्या भावना त्यांच्या शब्दात जाणून घेण्याची आत्मप्रेरना यातूनच झुंम व्हिडीओ द्वारा त्यांनी स्थलांतरिता बरोबर संवाद साधला.व त्यांच्या राहण्या -खाण्याची चौकशी व प्रकृती ची चौकशी केली व त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
ते म्हणाले,यांचेशी प्रत्यक्ष बोलताना मला हे जाणवले की ,येथील व्यवस्थेवर ते खुश असून त्यांना गावाकडे जाण्याची घाई आहे.त्यांची इतकी हतबलता मी पहिल्यांदा अनुभवली.राजस्थानातील एका कुटुंबाच्या भावना हृदयस्पर्शी होत्या.लहान लेकरासह दूर अनोळखी गावात राहणं त्यांच्यासाठी किती त्रासदायक आहे हे त्यांच्या संवादातून कळले.नांदेड च्या कुटुंबियाशी व तमिळनाडू च्या युवकाशीही त्यांनी यावेळी संवाद केला.ही सर्व मंडळी दाखवीत असलेला संयम व सामंजस्य पणा खरच कल्पनेपालिकडचा आहे.
चौकट व्यवस्था चांगली आहे….पण घरची आठवण येते
काहीजण प्रतिक्रिया देताना म्हणाले येथे आमच्या चहा,नाष्टा, जेवणाची चांगली व्यवस्था आहे .डॉक्टर पण येतात पण घरापासून लांब असल्याने आम्हाला घरची आठवण येते असे बऱ्याच जणांनी गहिवरून सांगितले.झूम संवाद आमच्यासाठी वेगळा अनुभव असून आपुलकीने विचारपूस केलेबद्दल घाटगे याना त्यांनी धन्यवाद दिले.थोडा संयम पाळा चित्र नक्की बदलेल असे सांगून घाटगे यांनी त्यांना आधार दिला.


