मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुलने आपल्या नावाबाबत किस्सा सांगितला आहे. त्याने हा किस्सा सांगताना आपल्या आईने २६-२७ वर्ष आपल्याशी खोटे बोलल्याचे सांगितले. गौरव कपूरच्या “ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स” या शोमध्ये राहुलने उपस्थिती नोंदवली होती, तेव्हा राहुलने अनेक गोष्टींबाबत मत दिले.
राहुल म्हणाला, “काही वर्षांपूर्वी मला समजले की माझी आई २६-२७ वर्षे माझ्याशी माझे नाव कसे पडले याबद्दल खोटे बोलत होती. ती शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे आणि ९०च्या दशकात शाहरुख खानच्या चित्रपटांमध्ये त्याचे नाव राहुल होते, म्हणून माझे नाव राहुल ठेवले गेले, असे मला सांगण्यात येत होते.”
केएल राहुलच्या एका मित्राने त्याला सांगितले, की शाहरुख खानचा पहिला चित्रपट ज्यामध्ये त्याचे नाव राहुल होते तो १९९४ मध्ये रिलीज झाला आणि राहुलचा जन्म १९९२ मध्ये झाला. केएल राहुल म्हणाला, ”मित्राचे म्हणणे ऐकून, मी गूगल केले आणि माझ्या आईने माझ्याशी खोटे बोलल्याचे कळले.”
या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात केएल राहुलच्या वडिलांनीही त्याला एक किस्सा सांगितला. ”माझे वडील दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे चाहते होते आणि त्यांनी चुकून गावसकरांच्या मुलाचे नाव रोहनऐवजी राहुल असे ऐकले. त्यामुळे त्यांनी माझे नाव राहुल ठेवले”, असे राहुलने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
- मंत्री छगन भुजबळ यांची क्रिकेट मैदानावर फटकेबाजी
- मंत्री अनुराग ठाकूर आणि रणवीर सिंगचा मल्हारी गाण्यावर जोरदार डान्स, पहा…
- IPL 2022 : एबी डिव्हिलियर्सनं कसा दिला RCBला निरोप? विराटनं सांगितली पडद्यामागची गोष्ट!
- पवार साहेबांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावं – सदाभाऊ खोत
- विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबद्दल प्रस्ताव मांडणार – दिलीप वळसे पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

