🕒 1 min read
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला असून त्यांनी विलगीकरणाचं कारण देत आठवड्याची मुदत मागितली होती.
ईडीने सरनाईकांना चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यांनी क्वारंटाईन असल्याचे कारण देत आठवड्याभराची मुदत मागितली होती. ते परदेशातून आले आल्यामुळे क्वारंटाईन असल्याचं ईडीला कळवलं होतं. तर, पुत्र विहंग याची पत्नी आजारी असल्याने त्याला देखील चौकशीसाठीनंतर बोलावण्यात यावं, अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली होती.
आज, सरनाईकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत असून आता ते चौकशीला सामोरे जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. येत्या गुरुवारी ते ईडीच्या चौकशीसाठी हजर राहू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
संजय राऊतांच्या नातेवाईकांना देखील ईडीच्या नोटीसा – निलेश राणे
“प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे,” असा दावा भाजप आमदार निलेश राणे यांनी दोन दिवसापूर्वी हिंगोलीमध्ये बोलताना केला होता.
महत्वाच्या बातम्या
-
‘योगी आदित्यनाथ मुंबईतून बॉलिवूड नेऊ शकत नाही, ते अभ्यासासाठी येत असावे’
-
विधान परिषदेच्या 6 जागा आम्ही जिंकू, पुणे तर वनवेच जिंकणार ! – पाटील
-
अन्नासाठी शेतकऱ्यांवर नाही तर स्विगीवर अवलंबून आहोत, म्हणणाऱ्याला स्विगीनेच फटकारले….
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
