Share

विराटचा फिटनेस फ्रिक कायम ठेवत अनुष्काने गरोदरपणात केले शीर्षासन

Published On: 

मुंबई । अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि पती विराट कोहली हे सेलिब्रिटी कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमूळे माध्यमांमध्ये चर्चेत असतं. तर अभिनेत्री अनुष्का गर्भवती आहे. ती आपल्या आरोग्याची खूप काळजी घेत आहे.

यासाठी तिचा पती विराट कोहलीदेखील खूप काळजी घेत आहे. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असला तरी तो बाळंतपणाच्यावेळी तो अनुष्कासोबत असणार आहे. प्रेग्नेंसी काळा दरम्यान देखील हे कपल नेहमीच त्यांच्या ऍक्टिव्हिटीजमुळे चर्चेत राहिले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा जानेवारी 2021 मध्ये आई-बाबा बनणार आहेत. लॉकडाऊन असो वा प्रेग्नन्सी अनुष्काने स्वत:ला फिट ठेवलं.

त्यामुळे ती प्रेग्नन्सीदरम्यान शूटिंग करत होती. केवळ चित्रीकरणच नाही तर अनुष्का प्रेग्नन्सीमध्ये योगासनंही करत आहे. अनुष्काने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विराटसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात गर्भवती अनुष्का विराटच्या मदतीने शीर्षासन करताना दिसत आहे.

या फोटो पोस्ट करताना अनुष्काने लिहिलं आहे की, ‘हा व्यायाम सर्वात कठीण होता. जुना फोटो. योगासनं माझ्या आयु्ष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. माझ्या डॉक्टरांनी मला सल्ला दिला होता की, प्रेग्नन्सीमध्येही मला सर्व योगासनं करायला हवी. मात्र वाकणारी किंवा वळणारी योगासनं वगळता इतर आसनं मदतीने करता येऊ शकतात.

शीर्षासन जे मी अनेक वर्षांपासून करत आहे, त्यासाठी मी भिंत आणि पतीच्या मदतीने तोल सांभाळून केलं जेणेकरुन अतिरिक्त सुरक्षा मिळावी. हे आसनही योग शिक्षकांच्या देखरेखीतच केलं, जे ऑनलाईन सेशनद्वारे माझ्यासोबत होते. प्रेग्नन्सीमध्येही मी माझी प्रॅक्टिस सुरु ठेवू शकले याचा मला आनंद आहे.”

https://www.instagram.com/p/CIPlweXJ7mw/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!