Share

रश्मी ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

Published On: 

मुंबई : राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी शिवसेनेतर्फे 4 उमेदवारांची यादी पाठवण्यात आली आहे. महाविकास आघाडीत सध्या तीन पक्ष आहेत. म्हणून प्रत्येकी चार – चार जागा वाट्याला आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. उर्मिला यांचा भगवा मास्क यावेळी लक्षवेधी ठरला.

काही दिवसांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी काही कारणास्तव कॉंग्रेसला राम-राम ठोकला. आता शिवसेनेतर्फे उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी,नितीन बानगुडे – पाटील आणि विजय अप्पा करंजकर ही चार नावे पाठवली असल्याची खात्रीलायक बातमी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे.

अनेक निष्ठावंत पक्षात असताना सर्वांना बाजूला सारत उर्मिलाचे नाव पुढे आल्याने काही प्रमाणात नाराजी वाढल्याची देखील चर्चा आहे. उर्मिला मातोंडकर आणि चंद्रकांत रघुवंशी हे कॉंग्रेस पक्षातून आयात केलेले उमेदवार आहेत.नितीन बानगुडे – पाटील आणि विजय अप्पा करंजकर हेच सेनेचे निष्ठावंत आहेत.पण इतर नावांची देखील चर्चा असतांना हीच नावे का? असा प्रश्नही सध्या विचारण्यात येतोय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!