Share

कोहलीने रोहित शर्माबद्दल केलेल्या वक्तव्याचे सलमान बटने केले कौतुक, म्हणाला…

Published On: 

नवी दिल्ली : रोहित शर्माबाबत (Rohit Sharma) विराट कोहलीच्या (Virat Kohli) वक्तव्याचे पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने (Salman Butt) कौतुक केले आहे. विराट कोहलीने रोहित शर्माबद्दल केलेले विधान अतिशय समंजस विधान असल्याचे त्याने म्हटले आहे.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषदेत भाग घेतला, ज्यामध्ये त्याने रोहित शर्मासोबतच्या मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले. विराट कोहली या संदर्भात म्हणाला की, माझ्यात आणि रोहित शर्मामध्ये असं काही नाही. गेली अडीच वर्षे मी हे सांगत आहे आणि हे सर्व सांगून मी थकलो आहे. मला जे काही हवे आहे किंवा करायचे आहे, संघाचे कधीही नुकसान होणार नाही आणि संघाला कधीही निराश होऊ देणार नाही. माझ्यात आणि रोहितमध्ये कोणतेही वाद नाही. रोहित शर्माला माझा पूर्ण पाठिंबा असेल

नुकत्याच झालेल्या वादानंतर विराट कोहलीने आपला पूर्ण पाठिंबा रोहित शर्माला दिला आहे, अशा पद्धतीने वक्तव्य करणे गरजेचे होते, असे सलमान बट्टने म्हटले आहे. सलमान बटच्या म्हणण्यानुसार, यामुळे संघासाठी एक उत्तम वातावरण तयार होईल.

आपल्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान सलमान बट म्हणाला, ‘विराट कोहलीने बर्‍याच अर्थपूर्ण गोष्टी केल्या आहेत. कोहली आणि रोहित दोघेही भारतीय संघासाठी मॅच विनर आहेत. संघाच्या वातावरणासाठीही ही खूप चांगली गोष्ट आहे. विराट कोहलीने रोहित शर्माला पूर्ण पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!