Share

रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री, मेडिकल चालकाविरोधात पोलिसांत तक्रार

Published On: 

बीड : शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा अधिक पैसे आकारून काही मेडिकल चालक रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करत आहे. अनेक ठिकाणी कारवाई करूनही संकटाच्या काळात मेडिकल चालक काळाबाजार करत आहेत. असाच एक प्रकार बीड शहरात उघडकीस आला आहे. बसस्थानकासमोरील लाइफलाइन रुग्णालयाशी संलग्न असलेल्या लाइफलाइन औषधी दुकानाविरोधात बीड पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांचे नातेवाइक शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये १४ एप्रिलपासून कोरोनामुळे भरती आहेत. तेथील डॉ. संकेत बाहेतींनी सोहनींना गुरुवारी रुग्णाला देण्यासाठी रेमडेसिविरची २ इंजेक्शन सांगितले. तेव्हा सोहनी हे डॉक्टरांचे पत्र घेवून बीड शहरातील बसस्थानकासमोरील लाइफलाइन मेडिकल येथे गेले. तेव्हा त्यांनी मेडिकलमधून २ इंजेक्शन खरेदी केले. एमआरपीनुसार २ इंजेक्शनचे प्रत्येकी ५ हजार ४०० रुपयांप्रमाणे विक्रेत्याने १० हजार ८०० रुपये बिल आकारले.

तेव्हा दुकानदारास या इंजेक्शनची एवढी किंमत नसताना जास्तीचे पैसे का घेता अशी विचारणा केली. तेव्हा मेडिकल चालकाने तुम्हाला इंजेक्शन घ्यायचे असेल तर घ्या या किमतीतसुद्धा तुम्हाला इंजेक्शन मिळणार नाही असे सांगितले. शिवाय पावतीची मागणी करूनही ती दिली नाही. शासनाने रेमडेसिविरला १४०० रुपयांची मर्यादा घालून दिलेली आहे. मूळ किमतीपेक्षा ८ हजार रुपये अधिक घेतल्याने सोहनींनी बीड शहर पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!