Share

‘अजित पवार…तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या’

Published On: 

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

दरम्यान, या घोषणेनंतर देखील अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर कोरोनाची वाढती संख्या पाहता पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना मागच्यासारखा कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत.

‘दुसऱ्या लाटेत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आम्ही कठोर निर्णय घेतला आहे. रुग्ण वाढल्यामुळे असे निर्णय घेण्याची वेळ आली. याला सर्वांनी व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही. तर मागच्यासारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल. त्यामुळे तशी वेळ येऊ देऊ नये अशी आम्ही विनंती करतो’. असे अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या या भाष्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, अजित पवार काही लाज शिल्लक आहे की नाही तुमच्यात… धमकी द्यायची नाही लोकांना, आता लोकं ऐकायच्या मनःस्थितीत नाही, राज्य सरकारने वाट लावली महाराष्ट्राची. तुम्ही आरोग्य व्यवस्था अगोदर नीट करा मग लॉकडाऊनची धमकी द्या असं राणे म्हणाले आहेत.

दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, अजित पवार आपण रोज उठून लॉकडाऊनची धमकी देता पण पुण्याचे आपण पालकमंत्री आहात तिथे परिस्थिती सर्वात गंभीर आहे, पुण्यात कोण तुमचं ऐकत नाही आणि धमकी तुम्ही महाराष्ट्राला देता. नेतेगिरी कामात दाखवा साहेब, लोकांचे जीव वाचतील, लॉकडाऊन हा फक्त एक पर्याय आहे, उपाय नाही असे राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!