Share

प.बंगालमध्ये पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 853 तुकड्या तैनात

Published On: 

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. 45 मतदारसंघात हे मतदान होत असून 15 हजार 789 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. एकूण 1 कोटी 12 लाख पात्र मतदार 319 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.

मतदान शांततेत पार पडावं यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 853 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बंगालमध्ये या आधी झालेल्या टप्प्यांच्या तुलनेत पाचव्या टप्प्यातील मतदानासाठीच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गेल्या शनिवारी कूचबिहार इथं झालेल्या अनुचित घटनेसारखा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून 24 परगणा जिल्ह्यात सीएपीएफच्या 283 तुकड्या तैनात केल्या आहेत.

आज मतदान होत असलेल्या सर्व 45 जागा भाजप लढवत असून राज्यातील सत्तारुढ तृणमूल काँग्रेस 42 जागा लढवत आहे. काँग्रेस, डावे पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंट हे पक्ष संयुक्त मोर्चा नावाखाली एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेसह आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि कर्नाटकात बेळगाव इथं लोकसभेच्या दोन तर विविध राज्यातील विधानसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूकही आज होत आहे. या 12 जागांमध्ये महाराष्ट्रातल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

दरम्यान,पश्चिम बंगालमधील निवडणुकीत आणि देशात इतरत्र असलेल्या पोटनिवडणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मतदानास प्रथमच पात्र ठरलेल्या युवकांनी आपला हक्क जरूर बजवावा, असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!