लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे दुसरी लाट ही भयंकर असणार हे स्पष्ट होत आहे. एकीकडे बाधितांची संख्या दररोज दीड हजाराने वाढत असताना आता मयतांचा आकडाही वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारच्या आरोग्य विभागाच्या अहवालात २० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहेे, तर १७६७ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
आरटी-पीसीआरच्या १२५८ चाचण्यांमध्ये ४५४ पॉझिटिव्ह व प्रलंबित अहवालापैकी ५४१ आणि रॅपिड ॲँटिजेनच्या ४११८ चाचण्यांमध्ये १२२६ पॉझिटिव्ह, असे एकूण १७६३ नवे रुग्ण आढळले आहेत. २० जणांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात आतापर्यंत मयतांची एकूण संख्या ८५९ झाली आहे. १६६३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडून जिल्ह्यात आतापर्यंत ५१९३८ जणांना बाधा झाली आहे.
पैकी ३६३७३ व्यक्ती उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या विविध कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरमध्ये ३९४७ रुग्ण, तर होम आयसोलेशनमध्ये १०७५९ रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात ८८० व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. सध्याची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात लातूर जिल्हा कोरोनाचे हॉट स्पॉट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- रेमडेसिव्हिरचा काळाबाजार! घाटीतील कर्मचारी, मेडिकल चालकासह तिघे अटकेत
- पैठणमध्ये रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी
- पैठणमध्ये लसीचा तुटवडा
- घाटीत २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू
- टीव्ही दुकानदाराला मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

