औरंंगाबाद : नामांकीत कंपनीच्या कारचे बनावट स्पेअरपार्ट विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर पोलिसांनी कारवार्ठ केली. या कारवाईत पोलिसांनी ३६ हजार ७०० रूपये किंमतीचे बनावट स्पेअर पार्ट जप्त केले असल्याची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली आहे.
जालना रोडवरील अपना बाजार कॉम्पलेक्स येथे असलेल्या गुरूमितसिंग कर्नलसिंग बिंद्रा (वय ५५,रा.सिडको) यांच्या कार डेकोरेटर्स शॉप आणि अमित प्रेमचंद जैन (वय ४८,रा.अहिंसानगर,महेशनगर) यांच्या सेवा ऑटोमोबाईल शॉप या दुकानातून हुंडाई कारचे बनावट स्पेअरपार्ट विक्री होत असल्याची माहिती हुंडाई कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रेवणनाथ विष्णू केकाण (वय ३९,रा.हडपसर,पुणे) यांना मिळाली होती. रेवणनाथ केकाण यांनी याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर, जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने कार डेकोरेटर्स शॉप आणि सेवा ऑटोमोबाईल शॉप या दुकानांवर छापा मारला.
या कारवाईत पोलिसांनी हुंडाई कंपनीचे बनावट ऑईल सील, ऑईल कुलंट, हेडलाईट स्वीच असेंम्बली, वॉल वॉकर, टि.पी.सेंसर जप्त केले. तसेच किसा कंपनीचे वॅप व्हॅल्यू, ग्लास रबर सेट आदी मिळून जवळपास ३६ हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही दुकानदारांविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी केलेली ‘ती’ चूक आता ते पुन्हा करणार नाहीत ?
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ


