Share

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नमच्या ‘या’ प्रोजेक्टद्वारे सईचे दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. काही दिवसापुर्वी समांतर २ द्वारे तिने वेब दुनियेत पदार्पण केले. तर नुकताच तिचा ‘निमी’ हा हिंदी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला.

आता सई ताम्हणकर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पणासाठी सज्ज आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘नवरसा’ या वेब सिरीज द्वारे सई तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात नऊ लोकांच्या वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. यातील एका कथेत सई ताम्हणकर भूमिका साकारणार आहे.

https://www.instagram.com/p/CR0PGvbDZVU/

‘नवरसा’ ची कथा माणसाच्या राग, करुणा, धैर्य, द्वेष, भीती, हशा, प्रेम, शांती आणि आश्चर्य या भावनाबद्दल आहे. २७ जुलै रोजी या वेब सिरीजचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. या वेब सिरीजमध्ये सूर्या, सिद्धार्थ प्रकाश राज, विजय सेतुपति, रेवती, ऐश्वर्या राजेश आणि अरविंद स्वामी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्गज कलाकाराचा भरणा आणि मणिरत्नम यांचे दिग्दर्शन यामुळे ही वेब सिरीज नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल. ही वेब सीरीज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!