Share

‘सायना’ चित्रपटाचं थीम साँग लॉन्च

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या भारतीय सिनेसृष्टीत सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांवर चित्रपट बनवले जात आहेत. यामध्ये क्रीडा विश्वातील धोनी, मिल्खासिंग, तसेच येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सरदार उधम सिंग’ असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाची भूमिका साकारत असून ती भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. लवकरचं हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, हा चित्रपट 100% ऑक्युपेंसीसह चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. वृत्तानुसार- सिनेमा हॉल पुन्हा एकदा 100 टक्के प्रेक्षकांसह सुरू होणार आहेत. त्यामुळे सायनाचा बायोपीक रिलीज करण्याची ही योग्य वेळ आहे. या चित्रपटाची कथा क्रीडा जगाशी संबंधित आहे.दरम्यान, 26 मार्च आणि 9 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता हा चित्रपट 26 मार्चला प्रदर्शित होण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘सायना’ चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलं आहे. चित्रपटाचं संगीत अमाल मलिक यांनी दिलं आहे. यापूर्वी अमाल मलिक यांनी ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मध्येही संगीत दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!