Share

मंत्री गुलाबराव पाटील ‘या’ नवसाची पूर्ती करण्यासाठी आले शिर्डीच्या साई दरबारी!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- विधानसभा निवडणुकीपूर्वी वनी येथील सप्तशृंगी देवी व साईबाबांना नवस केला होता. त्यांच्या कृपेने विधानसभेची निवडणूक जिंकलो. मात्र कोविडमुळे वर्षभर नवसपूर्ती करता आली नाही.

विधानसभा निवडणूक जिंकलो, त्यावेळीच साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवसपूर्ती करायची होती. मात्र लाॅकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. आज नवसपूर्ती झाल्याचे समाधान मिळाले. साईसंस्थानच्या प्रशासनाने भाविकांची दर्शन व्यवस्था उत्तम केली आहे.

येथे काही त्रुटी असतील तर पुढील सात दिवसांचा वेळ त्यांना द्यायला हवा,असे मत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. गुलाबराव पाटील काल साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला आले होते, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

ना.पाटील पुढे म्हणाले की, मास्क व शारीरिक अंतर ठेवण्याची काळजी घेतली. तर कोविडची दुसरी संभाव्य लाट येणार नाही. राज्यातील मंदिरे बंद करावीत, अशी राज्य सरकारची इच्छा व मानसिकता नव्हती.

मात्र कोविडचा फैलाव रोखण्यासाठी मनाविरूध्द निर्णय घ्यावे लागले. साई दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलो त्यावेळी भाविक सर्व नियमांचे पालन करीत असल्याचे दिसले. तसेच मंदिरे उघडल्यानंतर सुरु असलेल्या श्रेयवादावरुन गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणाही साधला आहे.

राज्य सरकारने राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाजपने राज्यभर ढोल-ताशा, घंटानाद करत या निर्णयाचे स्वागत केले असून मंदिर उघडण्यासाठी भाजपने आक्रमक पाऊल उचलल्यानेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला.

अशा अविर्भावात भाजप नेते बोलत आहेत. बाळ कुणीही जन्माला घालो, ते आमचेच आहे, ही मानसिकता पूर्वीपासून भाजपची आहे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!