Share

‘दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील’

Published On: 

पुणे : अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या राम मंदिराच्या पुनर्बांधणी दरम्यान एक किलो चांदीची वीट शिवसेना आणि गोऱ्हे कुटुंबीय यांच्या वतीने देण्याचा इच्छा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रकट केली होती.

ही चांदीची वीट राम मंदिराचे ट्रस्टी यांच्याकडे दिपावली पर्वकलात व बलिप्रतिपदेच्या पुर्वसंध्येला, गोवर्धनपुजेच्या दिवशी  अयोध्येतील श्री राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याकडे डॉ.गोऱ्हे यांनी सुपुर्द केली. यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, अयोध्येत होणार्‍या राम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. हे मंदिर भव्य दिव्य असणार आहे.

तसेच मंदिरासाठी अनेकांनी आजवर पुढे येऊन काम केले आहे. अयोध्येच्या श्री राम मंदिरासाठी सर्वस्व पणाला लावणारे व सातत्याने भूमिका मांडणारे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील. त्यांच्या योगदान स्मृती देण्यात आलेल्या चांदीच्या विटेचा आपण स्वीकार करत आहोत.

या दरम्यान, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या कोरोना लॉकडाऊन काळात दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या प्रवचनाच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या येथे आयोजित केलेल्या पूजेचे दर्शन घेतले व वंदन केले. स्वामी गोविंद गिरीमहाराजांचा महावस्त्र अर्पण करुन नीलम गोऱ्हे यांनी सत्कार केला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!