🕒 1 min read
मुंबई : अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे दिग्दर्शित ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेसंदर्भातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे. मुंबईत या मालिकेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यातून सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. समस्त पुजारी, अभ्यासक, शालिनी ठाकरे आणि महेश कोठारे यांच्यात ही बैठक पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. पण त्यावर योग्य चर्चा करण्यात आली. यानंतर मालिकेला विरोध नाही पण कथानकात बदल केल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला. तर मालिकेत योग्य तो बदल करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका २३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाली. मात्र प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत मालिका बंद करण्याची मागणी गुरव समाजातील पुजाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेतील माहिती पट चुकीचा दाखवून भावना दुखवल्याबद्दल व खोटी माहिती प्रसारित करून फसवणूक केल्याबद्दल कोठारे प्रोडक्शनवर कारवाई करा असे निवेदन गुरव समाजाच्या वतीने सरपंच राधाताई बुणे यांना देण्यात आले आहे.
उपसरपंच शिवाजीराव सांगळे यांनी या मालिकेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. खोटा इतिहास खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
तर ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी मालिकेतील चुकीची माहिती दाखवली तर ती खपवून घेणार नाही तसेच पुढे असे झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते आनंदा लादे यांनी जोतिबा देवाचा इतिहास हा केदार विजय ग्रंथानुसार मालिकेत दाखवण्यात आला नसून यामुळे विटंबना झाल्याचा दावा केला आहे.मालिका ही पौराणिक असावी. मात्र मालिकेतील भाषाशैली ही निंदनिय असल्याचे समितीचे अध्यक्ष नवनाथ लादे यांनी म्हटले आहे.
तर मालिकेत भ्रमनिरास झाला असून मालिका विचार विनिमय करून सुरू करावी असे मत समितीचे सचिव संदिप दादर्णे यांनी व्यक्त केले आहे. महेश कोठारे यांनी दिशाभूल केल्याचा आरोप ग्रा पं.सदस्य लखन लादे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी केलेले कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील’
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला आज नारळांची खास आरास !
- राज्यातील मंदिरे बंद असतानाही ‘या’ देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मिळाला बोनस!
- ‘हेच मंत्री स्वत:च्या जेवणाचा खर्चही केंद्र सरकारकडून मागतील’ : नारायण राणे
- आता धर्म पाहून प्रेम करायचे का? जीशान अय्यूबचा थेट सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
