लातूर: जुन्या पिढीतील आदर्शवत नेतृत्व सहकारमहर्षी शिवाजीराव नाडे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे, असे नमूद करत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे (वय ९६) यांचे शुक्रवारी (ता. ११) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पालकमंत्री देशमुख यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे की, आदरणीय शिवाजीराव नाडे (काकासाहेब) यांनी सहकार, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय यासह इतर अनेक क्षेत्रात निस्पृह वृत्तीने दिलेले योगदान सस्मरणीय आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, त्यांच्या जाण्याने या सर्वच क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. नाडे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करावी अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.
काकसाहेबांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सशस्त्र सहभाग घेतला होता, त्याच सोबत त्यांनी १९५२ मध्य रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सहकारी संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. जिल्हा मार्केटींग संस्थेचे ते अध्यक्ष होते. ढोकीच्या तेरणा साखर कारखाना, लातूरची जिल्हा बँकेची सातमजली इमारत व आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील डालडा फॅक्टरीच्या ( को – ऑपरेटिव्ह ऑईल इंडस्ट्रीज) स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दूरसंचार, वीज, रेल्वे, वृक्ष लागवड, फेरभरण आदी क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय काम आहे. तत्कालीन वीज मंडळाचे ते काही काळ सदस्य होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
- वाघाच्या वादात भुजबळांची उडी, भाजपला म्हणाले, ‘वाघ पंजाही मारू शकतो!’
- ‘खा.नवनीत राणांना मिळालेल्या सर्व सुविधा गोठणार, आर्थिक लाभांचीही वसुली होणार’
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
