Share

IND vs SA: युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर ‘या’ माजी खेळाडूंनी केलेले प्रश्न उपस्थित, म्हणाला…!

Published On: 

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील दुसरा टी-२० सामना कटक येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर गौतम गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गंभीरच्या म्हणण्यानुसार, चहलने गोलंदाजीतील विविधतेकडे लक्ष दिले नाही आणि फक्त साधी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. यामुळेच चहलच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भरपूर धावा लुटल्या. युझवेंद्र चहल आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करून आला आहे. पण दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याची कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही. दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये तो सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज होता. चहलने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ४९ धावा दिल्या. यादरम्यान त्याला एकच बळी मिळवता आला. त्याने १३व्या षटकात टेंबा बावुमाला बाद केले पण १६व्या षटकात त्याच्या विरुद्ध २३ धावा झाल्या.

चहलला आपला गोलंदाजीचा वेग बदलावा लागेल

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच्या मते, चहलने आपला वेग बदलला नाही आणि टाइट लेन्थवर गोलंदाजी करत राहिला. सामन्यानंतर गंभीर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला, ” चहलला आपल्या गोलंदाजीच्या गतीमध्ये विविधता आणणे खूप महत्वाचे आहे. जर चहलला वाटत असेल की मी वेगाने गोलंदाजी करून विकेट घेईन, तर तसे होणार नाही. डाव्या हाताच्या फिरकीपटूचे गोलंदाजीमध्ये विविधता आणणे हेच काम आहे. फिंगर स्पिनर हा तुमचा बचावात्मक गोलंदाज आहे पण मनगटाचा फिरकी गोलंदाज हा आक्रमक पर्याय आहे. चहलला आक्रमक मानसिकतेने खेळावे लागेल. तो ४ षटकात ५० धावा देत असेल, पण जर त्याने ३ गडी बाद केले तर तो संघाला अशा स्थितीत आणू शकतो जिथून तुम्ही सामना जिंकू शकता. पण ४०-५० धावा दिल्यानंतर त्याला एकच गडी बाद करता येत असेल, तर ती चिंतेची बाब आहे.”

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला आणि दुसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत २-० अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही संघातील तिसरा सामना १४ जूनला विशाखापट्टणम येथे खेळायला जाणार आहे. दोन्ही सामन्यात पराभूत झालेला भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. मागील दोन सामने पाहता भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!