🕒 1 min read
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवली. यानंतर आज राहुल गांधी ईडी कार्यालयात चौकशीला हजार राहणार आहेत. यामुळे देशभरातील काँग्रेस नेते कार्यकर्ते आता अधिक आक्रमक झाले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून विरोधकांना नामोहरण करण्यासाठी वापर केला जात आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या याच विधानावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आता निशाणा साधला आहे.
“नोटीस दिल्लीच्या गांधींना, कळा मुंबईच्या लाचारांना”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांना टोला लगावला आहे. राहुल गांधींना आलेली ईडीची नोटिस आणि त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना केलेल्या विधानावर चित्रा वाघ यांनी निशाणा साधलाय. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधकांना त्रास देत आहे. हे षडयंत्र आहे. म्हणूनच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा सुरू आहे. हा छळ हा देशाच्या स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहे, असं राऊत म्हणाले होते.
राज्यसभा निवडणुकीत आपल्या बाजूने वाटत असलेले अपक्षांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर “आमच्या हातात फक्त दोन दिवस केंद्रीय तपास यंत्रणा द्या, आम्हीही आम्हाला हवी ती माणसं शिवसेनेसोबत आणू “असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यावर या जगात प्रत्येक गोष्ट कष्टाने कमवावी लागते. त्यानरून “भीक मागून काहीच मिळत नाही. ED तर मुळीच नाही!”, असा टोला चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
