मुंबई: भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपातून निलंबित करण्यात आले आहे. नुकतेच भिवंडी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले होते. त्यानुसार त्यांना आज पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार होते. मात्र त्यांनी पोलिसांकडे चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. भिवंडी पोलिसांकडे ई-मेलद्वारे ही मुदत मागितली आहे.
दरम्यान नुपूर शर्मा यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात एक आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्याविरोधात मुंबई, ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर देशातच नव्हे तर जगभरात त्यांचा विरोध करण्यात आला.
यावरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत थेट मोदी सरकारवर निशाणा साधत ताशेरे ओढले होते. नुपूर शर्मा प्रकरणी भारताला दहशतवादी हल्ल्याच्या धमक्याही आल्या. यावरून सध्या विरोधकांकडून मोदी सरकारला टार्गेट केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL Media Rights : बापरे बाप..! डिजिटल आणि टीव्ही हक्कांसाठी लागली ‘इतकी’ बोली; वाचा!
- “केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचं काम सुरू” ; ईडी कार्यालयांवरील आंदोलनावर चंद्रकांत पाटलांचे मत
- अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? वाचा सविस्तर माहिती
- “विधानपरिषद, राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान काळजी घ्या” ; शरद पवारांचे मंत्री आणि नेत्यांना आवाहन
- “अजितदादा परत आमच्यासोबत या” ; विखे पाटलांच्या वक्तव्याने एकच खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

