टीम महाराष्ट्र देशा : देशभरात गुरुवारी १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान मोदींनी ही लाल किल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी वाढती लोकसंख्या रोखणे, एकदाच उपयोगी प्लॅस्टिकचा वापर थांबविणे आणि संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा आदर ठेवणे, या आणि इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
यातील एक महत्वाचा मुद्दा असलेला ‘एक देश एक निवडणूक’ या धोरणाला सदाभाऊ खोत यांनी पाठींबा दर्शवला आहे. त्यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निवडणूका होतात. यापेक्षा दर पाच वर्षांनी एकाच वेळी ग्रामपंचायतपासून ते खासदारकीपर्यंतच्या सर्व निवडणूक दोन महिन्याच्या कालावधी घ्यायच्या. दोन महिन्यात सगळ्या निवडणुका संपवायच्या आणि पाच वर्ष शांततेत काम करायचं असं म्हणत त्यांनी मोदींच्या धोरणाला सहमती दर्शवली आहे.
पुढे बोलताना त्यांनी दरवर्षी कोणती ना कोणती निवडणूक होते आणि लोक त्यात गुंततात. आचारसंहितेमुळे विकास कामांना खीळ बसते, अनेक कामे प्रभावित होतात. त्यामुळे दोन महिने निवडणुका घ्यायच्या. त्यानंतर पाच वर्षे निव्वळ विकासकामे करायची हे धोरण आपण स्वीकारायला पाहिजे असं विधान केले आहे.
दरम्यान, ‘एक देश एक निवडणूक’ या धोरणावर यापूर्वीही चर्चा झाली होती. परंतु विरोशी पक्षांनी याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्यावेळी हा मुद्दा मागे पडला होता. परंतु आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी हा मुद्दा चर्चेत आणला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळात याविषयी लवकरच कायदा बनण्याची शक्यता आहे.
- स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधून केलेलं तडाखेबंद भाषण एका क्लिकवर
- ‘भाजपला ‘एक देश – एक निवडणूक’ नव्हे तर ‘ एक देश- एक पक्ष’ हवाय’
- भाजपच्या मंत्र्याचा मूर्खपणा ; आजारी अरुण जेटलींना वाहिली श्रद्धांजली
- हो मी चहा विकला, देश नाही विकला – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

