🕒 1 min read
मुंबई : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी 26 ऑक्टोबरपासून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला राज्यातील विविध भागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि एसटीचा संप सुरू झाला. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामध्ये भाजपनेही उडी घेतली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे मुंबईतील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांसोबत ठिय्या मांडून आहेत.
यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीयेत. ‘सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे संप करणाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचं काम करत आहेत, असा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. तसंच, खोत आणि पडळकर यांना कामगारांच्या प्रश्नांची जाण नाही. केवळ राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत. त्यांनीच लोकांनाही ऐन दिवाळीत वेठीस धरले आहे, वेळ आल्यावर त्यांनाही बघू, असा इशाराच परब यांनी दिला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर येण्याची तयारी कर्मचारी दाखवत आहेत. त्यांना संरक्षणाची हमी दिली आहे. विलिनीकरण्याच्या मागणीबाबत त्यांनी समितीसमोर जावं. कामगारांनी कामावर जावे. राजकीय पक्ष पोळी भाजून बाहेर जातील पण नुकसान तुमचे होईल. हायकोर्टाने विचार करून १२ आठवड्यांचा कालावधी दिला आहे, तो आम्ही नाही दिला. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचे कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असं आवाहन परब यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीची कोठडी 15 नोहेंबरपर्यंत कायम
- जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस; काँग्रेस नेते राशीद अल्वींचं वादग्रस्त वक्तव्य
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’


