मुंबई : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील त्यांनी केलेल्या हिंदुत्वाचं विश्लेषण वादाच्या घेऱ्यात सापडलं. त्यानंतर आता काँग्रेसच्या आणखी एका नेत्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राशीद अल्वी यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेलं वक्तव्य चांगलंच वादात सापडलं आहे. ‘जय श्री रामची घोषणा देणारे सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत’, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला असून भाजपकडून यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे. सलमान खुर्शीद आणि राशीद अल्वी यांच्या वक्तव्यांमुळे सध्या काँग्रेस पक्ष मात्र टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे.
भाजप नेते अमित मालवीय यांनी राशीद अल्वी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राशीद अल्वी जय श्री रामची घोषणा करणाऱ्यांविषयी मत मांडताना दिसत आहेत. ‘जे जय श्रीरामची घोषणा देतात, ते सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे”, असं राशीद अल्वी म्हणाले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याची खातरजमा झाली नसली, तरी अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल होऊ लागला आहे.
सलमान ख़ुर्शीद के बाद अब कांग्रेस के नेता राशिद अल्वी जय श्री राम कहने वालों को निशाचर (राक्षस) बता रहे हैं।
राम भक्तों के प्रति कांग्रेस के विचारों में कितना ज़हर घुला हुआ है। pic.twitter.com/kHG3vXSpDW
— Amit Malviya (@amitmalviya) November 12, 2021
दरम्यान, राशिद अल्वी यांचा व्हिडीओ पोस्ट करताना अमित मालवीय यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राशिद अल्वी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना निशाचर (राक्षस) म्हणत आहेत. राम भक्तांच्या बद्दल काँग्रेसच्या विचारांमध्ये किती विष मिसळलं आहे’, असं या ट्वीटमध्ये अमित मालवीय म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
- भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘आधी 150 रुपये वाढवायचे नंतर रुपया, सव्वा रुपया कमी करायचे, हे धंदे बंद करा’


