नांदेड – राज्यातील शेतकरी सध्या विविध समस्यांचा सामना करत आहे. यातच आता शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकरी नेते माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत हे दि.१४/०७/२१ , बुधवार रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर असणार आहेत.
लोहा तहसील कार्यालयाच्यावर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली,उमरा येथील शेतकरी भीमराव शिरसाट यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट व श्रीराम फायनान्सच्या जाचाला कंटाळून अंतरगाव ता.नायगाव येथील शेतकरी मारुती शिंदे यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट सदाभाऊ खोत घेणार आहेत.सकाळी विश्रामग्रह येथे नऊ वाजता- पत्रकार परिषद, दहा वाजता- लोंढे सांगवी येथे शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
दुपारी बारा वाजता- उमरा येथे आत्महत्याग्रस्त भीमराव शिरसाट यांच्या कुटुंबाची भेट व दुपारी तीन वाजता- अंतरगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी मारुती शिंदे यांच्या कुटुंबाची भेट व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत व सायंकाळी सहा वाजता मुगाव येथे शेतकरी संवाद मेळावा होणार आहे, या दौऱ्यात जिल्हाअध्यक्ष प्रा. पांडव मंगनाळे ,नायगाव तालुका अध्यक्ष शहाजी पा. कदम,धर्माबाद तालुका अध्यक्ष व्यंकट कदम,बिलोली तालुका अध्यक्ष गणेश गिरगावकर सोबत उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद वंजारे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘…तर खांद्याला खांदा लावून काम करु’; नितेश राणेंच्या भाषणानंतर शिवसेना नेत्याने थोपटली पाठ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

