Share

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! न्यायालयीन कोठडी मुक्काम वाढला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. अनिल देशमुख हे 100 कोटी वसुली प्रकरणात अटकेत आहेत. सध्या देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत. आता पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा न्यायालयीन मुक्काम वाढला आहे.

अनिल देशमुख यांचा न्यायालयीन कोठडी मुक्काम वाढलाः

अनिल देशमुख यांना 27 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख, संजीव पलांडे यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. १०० कोटी वसूली प्रकरणात मागील वर्षी दोन नोव्हेंबर रोजी देशमुख यांना अटक केली होती.

परमबीर सिंग यांचे आरोपः

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. मुंबईतील मोठ-मोठे डान्स बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल केरण्याचे आदेश देशमुखांनी दिले असल्याचा धक्कादायक आरोप परमबीर सिंग केला होता.

याबाबतचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. तर या प्रकरणामुळे विरोधकांनी देशमुखांच्या राजीनामाची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे देशमुखांनी त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुर येथील घरी छापा टाकला. या छापा मध्ये मिळालेल्या माहितीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता त्यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा वाढवली गेली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!