Share

‘हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा’

Published On: 

पुणे : अमली पदार्थांवरून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा कलगीतुरा सध्या महाराष्ट्रात रंगला आहे. यातच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवत हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळवून देण्याची मागणी केली आहे. या मौल्यवान तंबाखूच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत होईल, असा खोचक टोला खोत यांनी लगावला आहे.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली होती. एनसीबीला तंबाखू आणि अमली पदार्थातील फरकही कळत नाही, अशी टीका एनसीबीवर केली होती. हाच धागा पकडत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठविले आहे. सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजासारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे. गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांना टोला लगावला आहे. राजू शेट्टी म्हणाले, हर्बल तंबाखूचा पहिला प्रयोग सदाभाऊ खोत यांनी आपल्या शेतात करावा. यावेळी शेट्टी यांनी खोतांबाबत अधिक भाष्य करायचे टाळत, मी त्या माणसावर जास्त बोलणार नाही, अशी टिपण्णी केली. तसेच, मी महाविकास आघाडीवर नाराज अन भाजप सरकारवर खुश अस काही नसून, माझी वाटचाल अशीच असणार आहे, जो आडवा येईल त्याला तुडवायचा हे धोरण कायम असणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!