Share

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अखेर नगर दौऱ्याचा मुहूर्त सापडला

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : नगर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टी नंतर दक्षिण तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे दोन वेळा दौरे निश्चित झाले. परंतू ते ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. अखेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगर जिल्ह्याच्या दौऱ्याला मुहूर्त सापडला आहे. आज शुक्रवार व शनिवारी या दोन दिवसाच्या दौऱ्यावर हसन मुश्रीफ आलेत.

शुक्रवारी सकाळी सात वाजता मुंबई येथून अकोले तालुक्याकडे रवाना झालेत.अकोले तालुक्यातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थिती लावत आहेत. उद्या, दि. २३ ऑक्टोबरला शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी व कोरोना स्थितीचा आढावा ते घेणार आहेत. गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले, अनेक महिन्यापासून पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आतातरी जिल्हा नियोजन समितीची बैठक घ्या, असे सांगितले.

महाराष्ट्रात महाआघाडी सरकार आल्यापासून एकही ठोस स्वरुपाचे काम दिसून येत नाही. भाजपच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती देण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. तर दुसरीकडे ज्या कामाचे उद्घाटन हे सरकार करत आहे, ते भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेले आहे. अशी टीका माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केली. भाजप सरकार असताना आ. बबनराव पाचपुते व माजी मंत्री राम शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी पूर्णतः मतदारसंघात लक्ष देऊन मतदार संघाचा विकास केला. मात्र, सध्याचे पालकमंत्री शोधून सापडत नाहीत. त्यांचा शोध घेण्याची वेळ आली असल्याची टीका हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता कर्डिले यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!