🕒 1 min read
पुणे : ड्रग्जप्रकरणातील माझा फोटो व्हायरल करणाऱ्याला लाज, लज्जा, शरम आहे की नाही? असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत उपस्थित केला. मुंबईत ड्रग्जप्रकरणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. याप्रकरणाशी निगडीत अजित पवार यांचा फोटो कुणीतरी व्हायरल केला होता. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
यावेळी अजित पवार म्हणाले, एनसीबीने ड्रग्जप्रकरणी धाडी मारल्या होत्या. त्यावेळी एका बड्या नेत्याचा मुलगाही या ठिकाणी असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यात पार्थ पवारांचं नावही पुढे आलं होतं, असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यावर अजितदादा म्हणाले की, जे काही असेल ते तपासा. उगीचच कुणाच्या मुलांचं नाव घेऊन त्यांचं करिअर का बरबाद करता. काही असेल तर त्याला शिक्षा करा. तुमच्या घरातला असो माझ्या घरातला असेल किंवा इतरांच्या घरातला असेल. नियम कायदा सर्वाना समान असतो, असतो का नसतो? असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित पत्रकारांना विचारला.
यावेळी अजित पवार यांना एनसीबीचे अधिकारी समिर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातील वादावर प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा अजित पवार म्हणाले, एक मिनिट … मला त्याबद्दल काही विचारू नका. मलिकांचे प्रश्न त्यांना विचारा. समीरचे प्रश्न समीर यांना विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी आलो नाही. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विद्यापीठ पुलाच्या बाबत बोलायला आलो. कोरोनाबाबतचं सांगितलं. दरोड्याबाबत मी बोललो. एका मुलीच्या हत्येबाबत बोललो. ऐका जरा… मी मागेही सांगितलं की इतरांनी काही केलं आणि ते असं म्हटले यावर उत्तरे द्यायला मी बांधिल नाही, असे रागात ते यावेळी बोलले.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- ‘डॉक्टर आणि रूग्ण यांच्यातील दुवा म्हणून ‘हेल्दी सोसायटी’चे कार्य’, मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा उत्साहात
- भारतीय संघाला टी-20 विश्वचषक जिंकण्याची जास्त संधी का?, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सांगितले कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
