मुंबई : काँग्रेसचे नते नितीन राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत नितीन राऊत यांनी वादग्रस्त पोस्ट केली. त्यांनी इंदिरा गांधींच्या काळातील दोन टपाल तिकीटं फेसबूकवर पोस्ट करत त्यावर कॅप्शन दिले. या पोस्टवरुन भाजप नेत्यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. वादग्रस्त फेसबूक पोस्ट टाकत वाद ओढवून घेणारे नितीन राऊत यांनी अखेर माघार घेतली आहे. राऊतांविरोधात ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर राऊंतानी ही फेसबूक पोस्ट हटवली आहे.
आपल्या फेसबूक पोस्टमध्ये नितीन राऊत यांनी दोन टपाल तिकीटांचे फोटो पेस्ट केले होते. यामध्ये एका टपाल तिकीटावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो होता. त्याची किंमत २० इतकी आहे तर दुसऱ्या तिकीटावर माकडाचा फोटो असून त्याची किंमत १०० इतकी आहे. इतकेच नाही तर ही पोस्ट करताना नितीन राऊत यांनी त्यावर लिहिले होते की, ‘इंदिरा गांधींच्या काळात ही टपाल तिकीटं छापण्यात आली होती. माकडाची किंमत पाच पटीने जास्त आहे.’
या पोस्टनंतर राऊंताविरोधात मुंबईत भाजपने आंदोलन केले. तसेच आमदार नितेश राणे यांनीही राऊंतावर पलटवार केला. ‘इंदिरा गांधींच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तिकीट छापले होते हे तर माहित होते. पण इंदिराजींनी या लंगूराचे पण बालपणीच तिकीट काढले होते हे आजच समजले, अशी खोचक टीका राणे यांनी राऊतांवर केली आहे. वाद वाढू लागल्यानंतर राऊतांनी ही पोस्ट डिलिट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे प्रकरण ?
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी सावरकरांविषयी एक वक्तव्य केले होते. महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती, असा दावा त्यांनी केला. त्यावरून पुन्हा एकदा वाद-प्रतिवाद सुरू झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही टपाल तिकीटे आपल्या अकाऊंटवर पोस्ट केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अखेर नगर दौऱ्याचा मुहूर्त सापडला
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले
- ‘त्या’ व्यक्तीला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?; ‘ते’ फोटो व्हायरल करणाऱ्यांवर अजितदादा चिडले
- ‘देशवासियांनी मेड इन इंडिया वस्तूच खरेदी कराव्यात’, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोदींचे आवाहन
- ‘जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोवर शस्त्रे खाली ठेवू नका’, पंतप्रधान मोदींचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

