Share

राज्यात सगळ्या निवडणुका पार पडत असतील तर आषाढी वारीला काय अडचण आहे ?

Published On: 

सांगली – राज्यातील वारकऱ्यांसह समस्त महाराष्ट्रातील भाविकांच्या मनात आषाढी वारीसंदर्भात अत्यंत आदराचे स्थान आहे. मात्र, गतवर्षीपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे वारीसारख्या परंपरांनादेखील ‘ब्रेक’ लागला आहे. नव्या नियमांमध्ये राज्य अनलॉक होत असताना निर्बंधांसह का होईना, पण वारीला परवानगी द्यायला सरकारला हरकत का असते, असा सवाल आता धार्मिक-राजकीय व भाविकांच्या वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री,मंत्री आणि प्रशासन कोरोना आटोक्यात आल्याचे सांगत पाठ थोपटून घेत असल्याचे वारंवार दिसून येत असल्याने आता विविध मागण्या समोर येत आहेत. यात आता प्रार्थनास्थळे तसेच वारीला देखील परवानगी मिळावी अशी मागणी होऊ लागली आहे. वारकरी बांधवांमध्ये यंदाच्या वारीसंदर्भातील निर्णयाबाबत उत्सुकता असली तरीही सरकारची घोळघालू वृत्ती सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण करू लागली आहे.

यातच आता या मुद्द्याचे राजकारण देखील होऊ लागले आहे.या संदर्भात रयतचे सर्वेसर्वा, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पंढरपूरच्या वारी बाबत राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेऊन परवानगी देणे गरजेचं आहे. कारण राज्यात सगळ्या निवडणुका पार पडत असतील तर आषाढी वारीला काय अडचण आहे ? असा सवाल खोत यांनी केलाय. वारकरी संप्रदायाने यंदा वारी काढण्याबाबतचा निर्णय घ्यावा. रयत क्रांती संघटना त्यांच्यासोबत असेल असा दावाही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!