Share

Nana Patole | “मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा राजीनामा घ्या”; नाना पटोलेंची आक्रमक भूमिका 

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | मुंबई : मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी प्रतापगड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेशी केली होती. यावरुन राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी लोढा यांना धारेवर धरलं आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अरबी समुद्रात बनवण्याचा दिखावा यांनी केला. तर दुसरीकडे सतत त्यांचा अवमान करायचा अधिकार त्यांना कोणी दिला?”, असा सवाल नाना पटोलेंनी केलाय. असली इंग्रज पद्धत आता महाराष्ट्र सहन करणार नाही. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आता माफी नाही. शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांनी राजीनामा द्यावा, असा इशारा त्यांनी दिलाय.

पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भाजपाच्या वतीने मलीन केली जात आहे. पण त्याने काहीही फरक पडणार नाही, उलट त्यांचं तेज अजून वाढत आहे. त्यांनी कितीही अवमान केला तरीही शिवरायांचा विचार संपणार नाही. माझं आवाहन आहे की महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या आमदारांनी स्वाभिमान असेल तर राजीनामे दिले पाहिजेत.”

नेमकं काय म्हणालेत लोढा?

मंगल प्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा सुटकेशी केली आहे. शिवराय आग्रामधून बाहेर पडले तसे शिंदे बाहेर पडले, असे लोढा म्हणाले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसे एकनाथ शिंदे यांनी देखील कोणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले एकनाथ शिंदे महाराष्ट्रसाठी बाहेर पडले, असे वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!