Share

Sanjay Gaikwad | एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या गनिमी काव्याशी, संजय गायकवाड यांचं वक्तव्य वादात

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Gaikwad | बुलढाणा : पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यानंतर शिंदे -फडणवीस सरकारमधील आणखी एका मंत्र्यांने शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची तुलना एकनाथ शिंदे यांच्याशी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. यावर बुलढाणा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाहीत, शिवाजी महाराजांनी देखील वेळप्रसंगी गनिमी कावा केलेला आहे. असाच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

“ज्यांनी शिवाजी महाराज किंवा महापुरुषांबद्दल वक्तव्य केलेली आहेत. त्यांना शिंदे आणि फडणवीस यांनी योग्य तो समज दिलेला आहे. पुढे असे वक्तव्य येतील असं वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

काय म्हणाले होते संजय राऊत –

“भाजपच्या सुधांशू त्रिवेदी याने छत्रपतींना माफिवीर ठरवले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज नायक नाहीत, जुने झाले सांगितले. आता बेईमान व्यक्तीशी शिवरायांची तुलना करुन महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्यातील सरकार खोके सरकार म्हणून अख्या देशात कुख्याच झाले आहे. या सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे का? की कोण सर्वात जास्त छत्रपतींचा अपमान करेल. त्याला काही दिल्लीने कोण बनेगा करोडपतीसारखे मोठे बक्षीस लावले आहे का? कोण करेगा छत्रपतीका अपमान, असंच दिसत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात चुकीचे विधान करून त्यांची तुलना एका पक्षाशी, राज्याशी बेईमानी करणाऱ्या व्यक्तिबरोबर करतात. शिवाजी महाराज काय बेईमान होते का?. दिल्लीत जाऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठाण मांडून बसा. ते तुमच्या हातात आहे. गृहमंत्री अमित शहांना मुख्यमंत्र्यांनी पत्र तरी पाठवावे. कॅबिनेटने निषेध करणारा ठराव तरी मंजूर करावा. मात्र हे लोक राज्याला मुर्ख बनवत आहेत. हे छत्रपतींचा मूग गिळून पाहत आहेत. डोळे मिटून पाहत आहेत.”

काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा – 

मंगलप्रभात लोढा म्हणाले होते की औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले होते पण ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोणीतरी कैद केले होते पण ते महाराष्ट्रासाठी बाहेर पडले. लोढा यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

काल शिवप्रताप दिवस होता. यानिमित्त प्रतापगडमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून पलायनाशी केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!