बंगळुरू : मेगा ऑक्शन २०२२ संपले आहे. ज्यात ५९० खेळाडू मधून केवळ २०४ खेळाडू सोल्ड झाले. यात आणेल मोठ्या नावांचा समावेश होता ज्यांना कोणत्याही संघात जागा मिळाली नाही. अनसोल्ड राहिलेल्या एकही मोठ्या क्रिकेटरने अजून वक्तव्य केलेले नाही. मात्र बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनच्या पत्नीने शाकिब अनसोल्ड राहिल्या मागचे कारण सांगितले आहे.
बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन याने मेगा ऑक्शनसाठी बेस प्राईस २ कोटी ठेवली होती. शाकिब त्या १२ खेळाडूंपैकी होता, ज्यांची बेस प्राईस सुद्धा २ कोटी होती आणि ते हि अनसोल्ड राहिले आहेत. शाकिबची पत्नी उम्मे अहमद शिशिरने फेसबुकवर यासंबंधी पोस्ट लिहली आहे. ” तुम्ही सगळे उत्साही होण्यापूर्वी हे जाणून घ्या. काही संघांनी त्याच्याशी थेट संपर्क साधला होता. जर तो पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल, परंतु दुर्दैवाने तो श्रीलंका मालिकेमुळे असे करू शकत नाही! म्हणूनच तो निवडला गेला नाही. ही मोठी गोष्ट नाहीये, शेवट नाहीये, पुढचे वर्ष नेहमीच असते!” तिने फेसबुकवर लिहिले आहे.
शाकिबच्या पत्नीने या पोस्टसह स्पष्टीकरण देत टिककरांना उत्तर दिले आहे. शाकिब अल हसनने फ्रँचायझींना सांगितले की तो इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या पूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहणार नाही, हेच कारण होते कि कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नाही.
महत्वाच्या बातम्या
- टी २० मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघाचा मस्ती करतानाच व्हिडीओ व्हायरल
- अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न! आरोपी म्हणाला, “शरीरात एक चिप आहे, मी रिमोटवरून…”
- सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा न्यूझीलँडकडून पराभव
- पक्ष प्रवेशावरून आमदार मंदा म्हात्रे यांचा आमदार गणेश नाईकांना टोला
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ उघड करणार सर्व गुपिते! ED ने मागितली कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

